Ration Card Update 2025 : महाराष्ट्र शासनाने अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागामार्फत दिनांक ४ एप्रिल २०२५ रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयाचा उद्देश राज्यातील अपात्र, दुबार, स्थलांतरित किंवा मयत लाभार्थ्यांचे शिधापत्रके ओळखून ती रद्द करण्यासाठी विशेष मोहीम राबविणे हा आहे.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत महाराष्ट्रात अंत्योदय अन्न योजना (Antyodaya Anna Yojana) आणि प्राधान्य कुटुंब योजना (Pradhanya Kutumb Yojana) राबवण्यात येतात. या योजनांतर्गत लाभार्थ्यांचे वर्गीकरण करण्यात येतात. तथापि, गेल्या काही वर्षांतील तपासणीत असे आढळून आले की अनेक अपात्र लाभार्थ्यांकडे अजूनही शिधापत्रके आहेत. त्यामुळे नवीन लाभार्थ्यांना समाविष्ट करणे कठीण होत आहे. यासाठी शासनाने ही शोध मोहीम हाती घेतली आहे.
Ration Card Update 2025 : या मोहिमेचा कालावधी आणि कार्यपद्धती :
ही शोध मोहीम दिनांक १ एप्रिल ते ३१ मे २०२५ या कालावधीत राज्यभर राबवली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत प्रत्येक शिधापत्रकधारकाची माहिती व कागदपत्रे तपासली जाणार आहेत. शिधापत्रक तपासणीसाठी विशिष्ट नमुना फॉर्म वापरण्यात येणार असून, तो रास्त भाव दुकानदार अथवा अधिकृत वितरकाच्या माध्यमातून गोळा केला जाईल.
तुम्हाला तुमचे रेशन कार्ड सुरू ठेवण्यासाठी खालील दिलेला अर्ज प्रिंट करून वरील कागदपत्र जोडून अर्ज रेशन वितरकाकडे सादर करायचं आहे.
Ration Card ekyc Online Update 2025
रेशन कार्ड धारकांना यापुढे अन्नढण्यासाठी आपली Ration Card ekyc देखील करावी लागणार आहे. ही केवायसी आपण मोबाइल द्वारे करू शकतो
लाभार्थ्यांकडून मागविण्यात येणारे आवश्यक कागदपत्रे : Important Doccument For Ration Card
शिधापत्रकधारकांनी त्यांचे वास्तव्य सिद्ध करणारे कोणतेही एक कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे.
- भाडेकरार
- निवासस्थान मालकीचा पुरावा
- एलपीजी कनेक्शन पावती
- वीज बिल
- मतदार ओळखपत्र
- आधार कार्ड
- ड्रायविंग लायसन्स इत्यादींचा समावेश होतो.
- सदर पुरावा एका वर्षापेक्षा अधिक जुन्या कालावधीचा नसावा.
गट अ आणि गट ब यादीचे वर्गीकरण
तपासणीनंतर लाभार्थ्यांची दोन गटांत वर्गवारी करण्यात येईल – गट अ: ज्यांच्याकडे योग्य कागदपत्रे आहेत आणि ते पात्र आहेत, व गट ब: ज्यांच्याकडे कागदपत्रांचा अभाव आहे. गट ब मधील लाभार्थ्यांना १५ दिवसांची मुदत दिली जाईल. त्यानंतरही पुरावा न दिल्यास त्यांची शिधापत्रके रद्द केली जातील.
या मोहिमेत काही महत्त्वाच्या बाबींवर विशेष लक्ष देण्याचे आदेश आहेत –
- एका पत्त्यावर एकच शिधापत्रक असावे.
- सरकारी, निमसरकारी किंवा खाजगी संस्थांतील ज्यांचे उत्पन्न एक लाख रुपये पेक्षा जास्त आहे, त्यांचे शिधापत्रक रद्द करण्यात यावे.
- मृत किंवा स्थलांतरित व्यक्तींची शिधापत्रके त्वरित रद्द करावीत.
- ज्या अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे चुकीचे शिधापत्रक जारी झाले त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी.
जनतेला माहिती मिळावी यासाठी स्थानिक स्तरावर जनजागृती मोहीम राबवण्याचे निर्देश दिले गेले आहेत. तसेच “गट अ” आणि “गट ब” यादी जनतेपुढे प्रसिद्ध केली जाणार नाही, याचीही स्पष्ट सूचना देण्यात आली आहे.
Reshan Card GR and Form
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी | येथे क्लिक करा |
रेशन कार्ड अपडेट जीआर पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
या योजने निगडीत अधिक माहिती करिता तुम्ही योजनेचा GR पाहू शकतात,कृपया GR आपल्या मित्र आणि परिवारासोबत जास्तीत जास्त शेयर करा अधिक महितीकरिता आमच्या naukrimelava.com संकेतस्थळाला ला भेट दया.